पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ प्रसन्नराघवनाटक हा राम बाळ हरकार्मुक वज्रसार झोलावतें मन मदीय ह्मणून फार ।। ४३ ॥ (पुन्हा पृथिवीकडे पाहून तिलाच ह्मणतो. ) आर्या स्वत्कन्या 'रतिसम ही मारापरि हा कुमार सुकुमार ।। याच्या हस्ती पडतां धनु हे होईल पुष्पसमभार ॥४४॥ श०- हे राजर्षे जनका, वेड्यासारखा पुनः पुनः विचार क. शाचा करतोस ? हा महर्षि काय सांगतो त्याला अनुसर. ज०- अनुसरलो आहेच. (मग रामाला ह्मणतो. ) मुला, गुरूजी काय सांगतात ते कर. ते जनकाचे वाक्य ऐकून रामचंद्र उभा राहून कंबर बांधतो आहे, तों इतक्यांत प्रतिहारी येऊन जनकास ह्मणते. राजा, तुझा जय असो जय असो. कोणी एक ब्राह्मण तुझ्या दर्शनाची इच्छा धरून दरवाज्याचे बाहेर उभा आहे, तेव्हां त्याला तुझ्या जवळ आणूं काय ? ज- वा! हे देखील जनकाला विचारले पाहिजे काय ? प्र०- आज्ञेप्रमाणे करते. ( असें बोलून त्या ब्राह्मणाला राजा जवळ घेऊन आली.) ज०- भटजी, मी नमस्कार करतो. प्रा०- हे राजा, तूं मुमति हो. ज- (मनांत ह्मणतो.) ही आशीर्वादाची तन्हा निराळीच आ. हे, असो ( मग उघड बोलतो.) भटजी, ह्या आसनावर बसा. ब्रा- राजा, मी निरोप सांगण्यासाठी आलो आहे. १ मदनाची बायको २ मदन २ चोपदारीण