पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ प्रसन्नराघवनाटक नुष्य उचलण्याची सूचना करीत आहे. करीनाका. (मग उघड ह्मणतो. ) हे राजर्षे जनका, चांगले स्मरण दिले. मला शिव धनुष्य पाहाण्याची उत्कंठा आहेच तर आतां तें एथे आणण्याविषयी सेवकांला आज्ञा कर; किंवा दुसरे कशाला पाहिजेत, मी रामचंद्रालाच आज्ञा करतो. ज- (आश्चर्य युक्त होऊन ह्मणतो. ) अद्यापि ज्याचे ओंठावर दूध दिसते अशा सुकुमार रामचंद्राला कठोर हर. कार्मक आणण्याविषयी आज्ञाकरतां, हा काय अनुचित व्यापार. तुझाला ह्या धनुष्याचा वृत्तांत माहीत नाहींकाय ? लोक ते चंड चाप हिमपर्वतरूप ज्याला दोरी 'भुजंगपति बाण रमेश झाला ॥ दो मडलें नमविलें शशिशेखराच्या मध्ये 'उदग्र पण सर्व धनुर्गणाच्या ॥३७ ॥ आर्या त्रिपुरामुरनारीच्या नेत्री बाष्पाश्रुपूर देणारें ॥ शंभूचे पूर्वी पण मग इंद्राचे दिखील होणारें ॥३८॥ वि० मलाही तें धनष्य माहीत आहे. लोक. सेवार्थ देवकरचामरवायुपाने झाला सुपुष्ट गुणसर्प शरीरमानें ।। तत्कर्षणे श्रम अपार शिवास झाला तो वर्षतां हिमकणास हिमाग गेला ॥३९॥ ज- तर तुझी असें दुर्धर जे धनुष्य ते आणण्याविषयी रामचंद्रास कशी अज्ञा करतां ०- केवळ आणण्याचीच आज्ञा करीत नाही, तर नमवि. १ वासुकी.२. विष्णु ३ बाहुमंडलाने ४ शिवाच्य!.५ श्रेष्ट ६ हिमाचल