पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ प्रसन्नराघवनाटक आर्या जो सूर्यवंश भूषण राजा दशरथ तदीय हे बाळ ।। मदनापरि सुंदर पण काळाचेही पराक्रम काळ ॥३२॥ ज- (आनंदाने ह्मणतो. ) श्लोक ज्याचे हस्त समस्तशत्रुवनितानेत्रस्थ जी काजळे ती ल्याले च धनगंणाहतिबळे घट्टे न ते सावळे । ज्याच्या तीव्र कठोर 'चापनिनदा शत्रुस्त्रिया ऐकतां चित्रांच्या परि निश्चलस्थिति अशा झाल्या भयाने स्वतां॥३३॥ आर्या इंद्रादिजयश्रीसह आकर्षी ज्यालतेस जो नीट ॥ बाहुयुगें भूवलया सह चापवलयही धरी धीट ॥३४॥ रविवंशरत्न दशरथ राजाचे कुमर अमररूप खरे ॥ पाहून हास्यवदने यांची हिमक रविलोक कुतुक सरे ॥३५॥ ज०- ह्या दोघांपुत्राला पाहून दशरथाची दोन्ही नयनें शांत | होतात; तस्मात तो मोठा धन्य आहे. श०- दोन्ही दिशा देखील शांत होतात. वि०- अरे चारी दिशा असें ह्मण. मल ज०- तर मग आणखीही दोन पुत्र दशरथाला आहेत - काय? वि०- होय, रामलक्ष्मणा सारखे च भरत शत्रुघ्र नामक आणखीही दोन पुत्र आहेत. श०- ऋष्यश्रृंग ऋषीने जे चरूंचे भाग दिले, त्यांचीच हीं फळे आहेत. १ धनुष्यशब्दाला. २ धनुष्याचादोरीस. ३ भूमंडळ४ हिमकर चंद्र