पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रसन्नराघवनाटक अंक असे होते हे काय बरें वि.- (मनांत ह्मणतो. ) सकल लोकांच्या लोचनांल आनंद देणारा जो आकाशस्थ चंद्र तो आणि शंकरशि स्थ जो चंद्र ह्यांत भेद नाहीं, दोन्ही एकच आहेत. (म उघड बोलतो. ) हे राजर्षे जनक राजा, हा अतिशय सौ दर्याचा महिमा आहे. ज- बरें विश्वामित्रा, ह्याच्या ताताचे पदवीला कोण भा ग्यवान प्राप्त झाला आहे ? वि०- राजा जनका. तो ह्यांचा पिता. श्लोक हे चंद्राचे किरण अथवा 'वीची गंगाजलांच्या चंद्राश्म्यांचा गिरिच अथवा ढीग हा केतकांचा ॥ या श्रांतीने सुरजनवधू ज्यांकडे पाहतात त्या यत्कीर्ति प्रतिदिश अशी नाटके खेळतात ॥३. रा०- (लक्ष्मणाला ह्मणतो. ) हे वन्सा, सर्व निर्मळ गु ज्यामध्ये भरले आहेत अशा आपल्या पित्याची स् ति हा मुनि करीत आहे. ल.- हे ज्येष्ठ बांधवा, आणखीही हा ऋषी आपल्या त ताची स्तुति करील. वि०- हे राजा जनका, आणखीही श्रवण कर. आर्या ज्याच्या कोदंडाने दैत्यस्त्रीभूविलास संपविले ॥ मग भुजबंधन इंद्रा इंद्राणीने हंसून दृढ च दिलें ॥३: १ लाटा. २ चंदकांत पाषाणांचा. ३देवांच्यास्त्रिया. ४ज्याचीकी ५ सर्वदिशांचेठांयीं. ६ दशरथाच्या. ७धनुष्याने. ८ आलिंगन,