पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रसन्नराघवनाटक अंक ३ आहेत अशा पृथ्वीच्या गर्भापासून निघालें में कन्यारत्न ते तुला शोभा देतेंना १ ज०- ते कन्यारत्न तर शोभा देतेच आहे; परंतु हे विश्वामित्रा, आपल्या प्रसादानें जामातरत्न देखील मला शोभवील! ( इतक्यांत रामचंद्राकडे अवलोकन करून कौतु - कानें ह्मणतो.) हे ऋषीश्वरा, श्लोक. हा कोण सर्वजनलोचन 'मोददाता जो बाळ फार दिसतो मदुकांति आतां ।। 'वैडूर्यरत्नकिरणापरि शोभमान जो कल्पपादप नवांकुर तत्समान ॥ २४ ॥ श०- हे विश्वामित्रा, हा दुसरा कोण ? श्लोक "गागेयपंकजसमप्रभ तत्समीप हा कोण बाळ दिसतो अति दिव्य रूप ॥ आसन्ननीलरुचिपंकज कोरकाच्या गुछा समान दिसतो नव चंपकाच्या ॥२५॥ वि०- ह्या उभयतांची नावें राम आणि लक्ष्मण अशी आहेत. ज०- वा : ही नावे तर कानाला अमृताप्रमाणे गोड लागली. श०- (राम लक्ष्मणांस न्याहाळून पाहून विश्वामित्रास ह्मणतो. ) हे ऋषीश्वरा, श्लोक. हे सुंदराकृति कुमार असून यांचे सत्प्रेम फार दिसतेच परस्परांचें ॥ १ ( मोद) आनंद. २ (वैडूर्यरत्न )पाचूचाखडा 3 (कल्पपादप) कल्पवक्ष. ४ ( नवांकुर ) नवाकोम" (गांगेय) सुवर्ण ६ (कारक ) कमळाचाकळा