Jump to content

पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५२ प्रसन्नराघवनाटक अंक ३ ल.- (शंकित होऊन ह्मणतो.) हे ज्येष्ठबंधो, हे राजे अ. सून ही ब्रह्मविद्युत निष्णात आहेत, यासाठी माझें मनाला आश्चर्य वाटते. रा०- वत्सा, ह्यांत काय आश्चर्य आहे ? श्लोक छत्रछाया क्षणसमय ही ज्यास झांकू शकेना तो चौयांचा जलपवनही शांत ज्यातें करीना॥ मत्तेभांचा मदमय तसा पंक जातें शिवेना त्याज्योतीचे दृढतर असे सख्य ह्या भभुजांना ॥ १७ ॥ वि.- हे शतानंदा, तूं ह्या राजांना राजहंस असें जें बोलला स ते योग्यच बोललास; कांकी हे सकल कुवलयो तस आहेत, तेव्हां हे राजहंसच खरे. ज०- हे भाषण आमचे जे पूर्वज त्यांनाच योग्य, कांकी ते सा र्वभौम होते, आणि मीतर कांही खेड्यांचा राजा आहे. तेव्हां मला हे कसे शोभेल १ वि०- हे राजर्षे, असें कां बोलतोस ९ श्लोक समस्त नपसंघ हा अवनिरक्षणातें करो परंतु अवनीप तूं यश असें तुला बाठरो॥ सुवर्णरुचिकन्यका निपजली जिच्या अंतरी जगांत पृथिवी तुला जनक त्या तिचा ही करी ॥१८॥ ज०- हे भगवन, अनेक भुवन निर्माण करण्याविषयीं निपु. ण असे जे आपण त्या तुमच्या चमत्कारिक भाषणाचे वर्ण. न काय कराव. १ मत्त हत्ती, २ ( कुवलय )मूमंडल; कमळ, ३ ( उत्तंस ) श्रेष्ठ