पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रसन्नराघवनाटक अंक ३. श्लोक 'सांग जेथे राहतात निःसपत्न तिघी जणी॥ त्रयी तशी राज्यलक्ष्मी योगविद्या असा गुणी ॥९॥ (तदनंतर जनक राजा येऊन हात जोडून पाहून ह्मणतो.) अरे, आर्या. हेमापरि निजदेहा तपोमयाग्नीत टाकिता झाला॥ तेणे 'वोत्कर्षाप्रति पावे तो मुनीश हा आला॥ १० ॥ (जनकराजा पुढे सरून ह्मणतो. ) हे भगवन् मी आपणास प्रणाम करतो. वि०-हे राजर्षे, हे वसुधंद्रा सीरध्वज राजा, तुझा मनोरथ परिपूर्ण होवो. ( असा विश्वामित्राने आशीर्वाद दिल्यानंतर ते सर्व ही यथायोग्य स्थानी बसतात.) ज०- हे भगवन, ऋषीश्वरा, आतां मला इंद्र मणणे हे मा झ्या हलकेपणाचेच कारण आहे. वि०- कसे बरें ? ज०- सांप्रत काळी इंद्रापेक्षाही मी अधिक आहे. - आर्या. हे गाधितनय कल्पद्रुम ही न तसा सुरेश सुखदाता॥ भवदीयपादवंदनविधि झाला हा जसा मुखद आतां ॥११॥ वि०- वा! काय तुझा थोरपणा वर्णावा ! तूं सहजानंदरूप जो अमृतसमुद्र त्यांत बुडालेला असून आमच्या समागमापासून उत्पन्न झाले जे सुखाचे बिंदु त्यांनाच अधिक मानतोस. ज०-- हे भगवन् राज्यकारभारामध्ये मग्न जो मी त्याला स. हजानंद कोठून प्राप्त होणार १ अव्यंग २ वेदत्रयी ३कांनीचा उत्कर्ष, दुसराअर्थ जातीचाउत्कर्ष