पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

| अंक ३ प्रसन्नराघवनाटक रा०- जो योगीश्वर ह्या नामाने प्रख्यात आहे तोच ऋषि काहा वि०- वन्सा तोच हा. श्लोक. दिवाकराच्या चरणप्रसादें जो बोध पावून खुशाल नांदे ॥ योगीश्वरख्यातिपतिवरेला लक्ष्मीस पद्मापरि सम झाला॥७॥ तर चल आपण आतां राजवाड्यांत जाऊ. ( मग तिघेही जाऊ लागतात तो पडद्यांतून कोणी एक पुरुष पौ. रस्त्रियांना आज्ञा करतो. ) अहो पौरस्त्रियांनो, श्लोक टाका सडे चंदन कुंकुमाचे मांडाच मुक्ताफळ युक्त माचे ॥ मुगंधपुष्पे उडवा अपार करा अशी ही नगरी तयार ॥ ८ ॥ वि०- आमच्या आगमनाने आनंद पाऊन जनकाचा उपा. व्याय शतानंद हे बोलतो आहे. (इतक्यांत शतानंद पडद्याच्या बाहेर येऊन ह्मणतो.) हे भगवन, ऋषीश्वरा, मी वंदन करतो. वि०- हे वत्सा, शतानंदा, तुझ्या आयुष्याची वृद्धि असो. रा०- हे भगवन, जनक राजा आपली वाट पाहात बसला ' आहे. वे.- (विचार करून ह्मणतो. ) काय जनकराजाची योग्यता आहे! १ कुल स्त्री