पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ प्रसन्नराघवनाटक . असतो ? अरे, हा सौभाग्यलक्ष्मीचा खेळण्याचा चेंडू आहे. खु०- (शंकित होऊन ह्मणतो.) अरे, हाळ बोल; नाहीं तर आपल्यासारखे अंत:पुरांत फिरणारे जे आहेत त्यांचा सुंदरपणा राजाचे कानी गेला तर तो रागावेल. कु०- अरे, भ्यावयाला नको, ह्यावेळेस राजा बागेतल्या बं. गल्यांत आहे. खु०- छे छे ! आज कोणीएक मोठा ऋषी पाहुणा येणार आहे, त्याची वाट पाहात तो बाहेरच्या मंडपांत बसला आहे. कु०- तर आपला घात झाला. ख०- कोणतारे क०- अरे, पूर्वी एक याज्ञवल्क्य झणून मोठा ऋषी आला होता. त्याने उपदेश केल्यापासून राजा डोळे मिटून रात्र घालवितो. आतां पुन: ह्या दुसन्या ऋषीने उपदेश केला, हणजे दो अंतःपुरांत येणेच सोडील. मग आमची गरज अर्थातच त्याला राहाणार नाही. खु०- तूं बोलतोस हे खरे; परंतु मला वाटते, की हा महर्षि आमच्या राजाला उपदेश करण्यासाठी आला नाही, - शिवधनुष्य पाहाण्यासाठी आला आहे. कु०- अरे, होम करकरून त्याचे डोळे धुरकट झाले असती. ल; त्याला शिवधनुष्य पाहाण्याची गरज काय तस्मातू - मला असे वाटते, की हा कोणी क्षत्रिय ब्राह्मण असेल. खु०- (हंसून ह्मणतो.) अरे कुबड्या, तुझी बुद्धि फारच सूक्ष्म आहे. कारण तूं ह्मणतोस त्याप्रमाणेच हा खरोखरी क्षत्रि. य ब्राह्मणच आहे. कु०- तर काही तरी अनर्थ होईल असे वाटते, कारण हा