पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रसन्नराघवनाटक अंक ३. नंतर एक खुजा पडद्याच्या बाहेर येतो, आणि आपल्या शरीराकडे पाहून आश्चर्याने ह्मणतो, वा ! मी किती तरी उंच आहे बरें! असाच जर मी आंत गेलो, तर ह्या दरवाज्याची वरची बाजू मोडून तर पडणार नाहींना ? त्यासाठी लऊन चालावें हें बरें. (असें बोलून लवतो.) इतक्यांत पडद्याच्या बाहेर एक कुब्डा येऊन ह्मणतो. मित्रा खुजा, आतां तर तूं सर्वगुणसंपन्न झालास. खु०- कसा बरें. कु०- तूं पहिलाच खुजा आहेस, आणि त्यांत कुब्डा ही झालास. खु०-( क्रोधाने ह्मणतो. ) मूर्खा, अरे कसारे तूं आपल्या कु. ब्डेपणाचा दुसन्यावर आरोप करतोस, खरें मणशील तर तूंच मुळचा कुब्डा आहेस; आणि मी तर आतां ह्या दरवाज्याचे शिखर मोडेल ह्मणून बळेच कुण्डा झालो आहे. कु०- ( हंसून ह्मणतो.) अरे, तुझें आंग तर वीतभर उंच आहे, आणि दरवाज्याचे शिखर मोडेल ह्मणतोस हे कसे ? (पुन्हा क्रोधाने ह्मणतो.) अरे लबाडा, मी कुब्डा ह्मणू. केन तुला कोणीरे सांगितलें ? CARE खु०- दुसरे कोण सांगणार ? पोळाच्या कोळ्यासारखा तुझ्या पाठीवर जो हा मांसाचा गोळा दिसतो त्यानेच सांगितले. कु०- ( हंसून ह्मणतो.) अरे मूर्खा, असा मांसाचा गोळा को.