पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना संस्कृत भाषेची शक्ति, प्रौढी व तीतील अलंकार हे माहा. राष्ट्र भाषेत नाहीत, ह्यामुळे संस्कृतांतील रस बरोबर माहाराष्ट्र भाषेत उतरणे कठिण आहे, तथापि यथामति मला जितका रस साधता आला तितका साधला आहे. ह्यांत उणे असेल तें पूर्ण करणे विद्वानांकडे आहे. मूल ग्रंथांत सात अंक केले आहेत त्याप्रमाणे भाषांतरांत ही सात अंक केले आहेत. कवितेत जे कठिण शब्द आले आहेत, त्यांचा अर्थ खाली लिहिला आहे. कठिण शब्द दृष्टिचकन राहिले असतील त्याविषयी विद्वानांनी क्षमा करावी.