पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/4

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

22 प्रस्तावना. TETTE ह्या नाटकाचे नांव प्रसन्नराघव. हे नाटक जयदेव झणून एक पूर्वी महा कवी होऊन गेला त्याने केले आहे. हे फार सुंदर आणि विद्वानांस मान्य असे आहे. ह्या कवीची कविता करण्याची शक्ति आणि वर्णन करण्याची शैली फा. रच थोड्या कवीला आहे. ज्यांस संस्कृताची माहितगारी कमी त्यांस ह्याची कविता पहिल्याने कठिण वाटेल; परंतु त्यांनी ती पुष्कळ वाचली असतां तिची गोडी लागून तिचा रस समजेल. ह्या कवीचे रचनेत कोमल शब्द फार यतात. ह्या नाटकांत वीर, शृंगार, आणि करुण हे रस फार चांगले. साधले आहेत. शब्दालंकार आणि अर्थालंकार ही पुष्कळ ठिकाणी आहेत, परंतु अर्थालंकारांवर ह्या कवीचे लक्ष्य विशेष दिसते. ह्या नाटकांत सीतास्वयंवरापासून रावणाचा वध करून रामचंद्र सीतेला घेऊन अयोध्येस परत आले एथपर्यंत रामचरित्र वणिलें आहे. ह्या नाटकाचे हे भाषांतर मुलग्रंथाप्रमाणेच गद्यपद्यात्मक केले आहे; परंतु मूलांत जी श्लोकांची वृत्ते आहेत त्याच व. तांनी येथे श्लोक बांधले आहेत असे नाही. जेथें में वत्त साधलें तेथें तें वृत्त घेतले आहे. ह्या ग्रंथांत श्लोक व आयां ही मात्र पये आहेत. भाषांतर केवळ मूळाप्रमाणेच आहे असे नाही. कोठे मूळचे गाळले आहे, कोठे फिरवून लिहिले आहे, आणि कोठे नवेंच करून घातले आहे. जर संस्कृताप्रमाणेच भाषांतर केले असते तर कित्येक स्थळी ते मराठी वाचणारांस गोड लागले नसते, व नीट ही वाटले नसते; ह्मणून फेरफार करणे अवश्य वाटन तो केला आहे.