________________
अंक २ क. प्रसन्नराघवनाटक पी०- (आम्रवृक्षाची खांदी हातांत धरून कौतुकानें ह्मणते.) सखे, पाहा पाहा. ही कोवळी पाने नखाग्रांनी टोचलेली दिसतात; न्यापक्षी खचीत ही कोणी चतुराने आपल्या हाताने सत्कारयुक्त केली असे वाटते; किंवा आपल्या धनुष्यवल्लीच्या शंकेने स्वतां मदनानेच हातांत धरली असे वाटते. रा०- तुजविषयी माझा तर्क तर असा चालतो. श्लोक माझेंच हे धनु ह्मणूनच मन्मथानें मध्ये तुझी तनुलता धरली कराने । त्रैलोक्यवश्यकर तीन करांगुलींच्या रेषा मिषे उमटल्या च वलित्रयीच्या ॥ १७ ॥ स०- राजकन्ये, ही नेवाळीची वेल; आणखी हे पाहा. GST आर्या नेवाळीपुष्पाच्या मकरंदातें पितात हे अमर ।। चिरकाल वास ज्यावर तेंही त्यजितात कमलरूपघर ॥१८॥ सी०- तीच आर्या ह्मणते. रा०- वा! दुसऱ्यालतेचे वर्णन कशाला पाहिजे. खचीत तूंच लता आहेस. श्लोक पूर्वी ऋतू शिशिर बाल्यामिषे च गेला मागून यौवनमिषेच वसंत आला।।। ही सुंदरस्तनमय'स्तबकांस ल्याली तेणें तुझी तनुलता सुखदाच झाली ॥ १९ ॥ १ ( स्तबक.) गेंद