पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रसन्नराघवनाटक अंक स- राजकन्ये, हे ते चंडिकेचे देऊळ. सी०- (हात जोडून ) हे देवि शिवपत्नि तुला नमस्का असो. स- (हंसून ह्मणते.) ही नमस्काराची चाल बरीच आहे. सी०- (प्रीतियुक्त क्रोधानें ह्मणते.) पुरे असलें भाषण. स०- (हात जोडून). लोक अत्यंतकोमलशरीर शिवांकसेवी आशा मदीय परिपूर्ण करोच देवी॥ माझ्या सखीस पति सुंदर तो मिळावा ज्याचे स्वरूप बघतां स्मरही पळावा ॥१०॥ रा०- अरे, कसा हा सखीजन हिच्या विवाहाविषयी उत्कंठि आहे, (विचार करून ) ही वयांतच आली आहे पहा. श्लोक गेला बाळपणा परंतु न कसे तारुण्य अंगी पहा ।। गेला मूढपणा अजून न कसा चातुर्यसंचार हा ।। स्पर्शना वय कोणचें चहि कसे ती मुंदरीची पहा ।। देते सौख्य तनू मुमर्म च असे हे मन्मथाचे अहा ॥११ स- हे देवि, जोपर्यंत माझी सखी खिन्न झाली नाही, तोपर्य त माझा मनोरथ पूर्ण कर. सी०- (प्रीतियुक्त क्रोधाने ह्मणते.) कशासाठी मी खिन्न होईन स०-अगे, राजहंसकन्ये, कां खिन्न होतेस, हा तुझा कांत अ ब्याच्या झाडावर दिसेनासा बसला आहे. सी०- सखे, हत्तीच्या छाव्याच्या कंठशब्दासारखा गोड कोणाचा कंठशब्द ऐकावयाला येत आहे बरें । तर तो आ १ मदन.