________________
प्रसन्नराघवनाटक अंक वसंतवायू मग तो निघाला की शंकरा सर्पधरास भ्याला ।। हळूहळू यास्तव काय येतो माझ्या मनी हाच विचार होतो ॥ ४ ॥ ल.- रामा, माझा तर असा तर्क चालतो, की. श्लोक फुलांच्या वर्षावें निजवनतटीं पूजित असा लतास्त्रीनी केला नगररमणीनी नृपजसा ।। बसे हा 'सारंगी भ्रमरवनितागानरसिकी वसंताचा वायू शिथिलगति अत्यंत चनकी ॥५ रा०- वन्सा, आतां हे वर्णन पुरे. भगवान् विश्वामित्र क षी याज्ञवल्क्य ऋषीस भेटावयास गेले आहेत, तो त्यां च्या सायंकाळच्या देवपूजेला चांगली फुलें तोड. लक्ष्मण बरें ह्मणून फुलें तोडावयास गेला. ( राम पाहून ह्मणतो., वा : एथें देवीचे देऊळही आहे. ( हात जोडून ) आर्या माते दयानदी तूं नयनमुधालहरिबिंदुवृष्टि कर ॥ शशिधर हररमणि तुला दोन्ही जोडून वंदितों स्वकर ॥६ (पुन्हा दुसरेकडे पाहून ) अरे, पाहा हैं सरोवर यां कमळांवर राजहंस बसले आहेत, त्यामुळे हे किती रमण य दिसते; आणि हे पाहून माझे मनास किती आनंद होतो (पुन्हा कौतुकाने) वा! कमलवल्लीवनांत आपली स क्रीडा करीत असतां तिला यकून हा कलहंसबालक आ प्रवृक्षाच्या खांदीवर बसला आहे ! ( कानोसा घेऊन ) अ रे, काय विलक्षण मनोहर शब्द आहे! ( विचार करून १ हरिणावर