________________
प्रसन्नराघवनाटक अंक २ त्यांतून विशेषेकरून ह्या माल्यवानाच्या पदरी बातमीदार ! लोक फार आहेत. सं0- तर, तूं मिथिलेच्या उपवनांत कां आलास ९ त- मी असे ऐकलें, की रावण मिथिलेमध्ये आला आहे, त्याचे दर्शन घेण्यासाठी पहिल्याने एथें आलो. आतां ताट. केच्या वनांत जाणार आहे; परंतु तूं कोण आहेस ते सांग? सं0-- जो पहिल्याने ताटकेकडे पाठविला होता तोच मी, मिथिलेच्या उपवनांत येण्याचे कारण तुझें आणि माझें एक. च आहे. त०- तर आतां तानवडांनी युक्त ताटकावन आहेना ? सं०- अरे वन ताटका युक्त आहे की नाही ह्याचाच अगो दर विचार. त.- तर मग ताटका कोठे गेली आहे सं०- नगरांत. त- काय दशरथाच्या. सं0- छेछे, यमाच्या. वन त-हिला यमाच्या पुरीत कोणी पोचविलें. सं०- रामबाणानेच. त०- हा राम कोण ! ( विचार करून ह्मणतो. ) दशरथा च्या दोन पुत्रांपैकी जो वडील तो. तर आतां ते ताटके चे पुत्र कोठे आहेत ते सांग १ ला सं.- एक सुबाहु तर ताटकेलाच भेटायाला गेला. दुसरा मारीच, तोही रामबाणाने व्याकुळ होऊन जिवंत असून मेल्यासारखाच दूर जाऊन पडला आहे. in त०- हें वर्तमान रावणाला कोणीच कसे कळविले नाही ? सं.- मारीचानें आक्रोश केला तेव्हांच ते रावणाला कळले. त- तर रावणाला कसा बरे राग आला नाही ?