पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक . प्रसन्नराघवनाठक त्याने मला ताटकेच्या वनांत पाठविले. त्याचे ऐकण्यांत असें आले, की विश्वामित्र ऋषीने अयोध्येचा राजा दशरथ ह्याकडे जाऊन राम आणि लक्ष्मण हे त्याचे दोन पुत्र आ. पल्या यज्ञरक्षणासाठी मागीतले; व ऋषीची इच्छा अवश्य पूर्ण केली पाहिजे, ह्यास्तव राजाने आपले पुत्र त्याच्या ह. वाली केले. सं०- मग काय झालें त०- नंतर ऋषीने त्या राजाला रत्नखचित दोन तानवडे दि. ली; आणि सांगितले, की राजा, ही तानवडे देवलोकची आहेत; ही दोन्ही 'वीरसूच्या कानी योग्य, तेव्हां ही कौ. सल्येच्या कानांत घालावी. दशरथ राजाने ही गोष्ट मान्य केली. नंतर रामलक्ष्मण ह्यांस बरोबर घेऊन तो ऋषी आपल्या आश्रमास निघून गेला. सं०- पुढे काय झालें । त.- तदनंतर हे वर्तमान माल्यवानाने ऐकून ती तानवडे रा. वणाची माता जी निकषा तिच्याच कानांत असावी; अ. सा विचार करून त्यांचे हरण करण्याविषयी ताटकेला सुचवावें, ह्मणून पूर्वीच एक राक्षस तिजकडे पाठविला होता. आतां ताटकेने ती तानवडे संपादिली असतील, अ. सा विचार करून ती आणण्यासाठी मला पाठविले आहे. स.- त्या माल्यवानाला हे सर्व वर्तमान कसे समजले १ समश्लोक वाती अद्भुत गंधयुक्त हि तशी उत्कृष्ट कस्तूरिका ।। विद्या दोषविहीन हे त्रय कधी झांकून राहील का । तेलाचा पडताक्षणी पसरतो पाण्यांत बिंदू जसा ।। तद्वत् हें यही जगीं पसरतें सिद्धांत याचा असा ॥ १ ॥ १ वीरमाता