पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रसन्नराघवनाटक अंक २ (तदनंतर पडद्याच्याबाहेर एक तपस्वी येऊन चहूंकडे | पाहून ह्मणतो.) वा! ही बाग किती सुंदर दिसते. एथें वेलां. वर हजारों पोपटांची पिले बसून किलकिल करिताहेत. (प. डद्याकडे पाहून ह्मणतो.) हा कोणी संन्यासी इकडे येत आहे; स्वामी, इकडे या, इकडे या. (तो संन्यासी पडद्याच्याबाहेर ये. ऊन ह्मणतो.) कुशल आहेना ? त०- होय; आपलेही कुशल आहेना ९ सं0- आतां तुमच्या दर्शनाने तर अधिकच आहे. त०- (प्रीतीने बोलतो.) स्वामी, ह्या कीटकयुक्तभूमीवर जपून फिरण्याने आपणाला श्रम झाले आहेत; तर आतां ह्या । मिथिलानगरीत पांच दिवस राहून विश्रांती करावी. प्र. संगेकरून जनकराजाचेही दर्शन घ्यावें. सं०- आह्मी निरिच्छ आहों, आमाला राजदर्शनाचे प्रयोजनकायर त०- हा सीरध्वजराजा ब्रह्मविद्युत निष्णात आहे, त्यापी आपणासारख्यांस दर्शन घेण्यास योग्यच आहे. सं०- अहो, राजा असून ब्रह्मवेत्ता हे खरे काय ? त०- स्वामी, हे खरेंच आहे. देव दशकंठा (असे अर्धे बोल. ल्यानंतर ) देव'शितिकंठाची आज्ञा १ सं0- (हंसून ह्मणतो.) आतां बोलणे फिरवून रूप झांकणे पुरे. मला समजले, तूं खचीत राक्षस आहेस. त०- तर तूं कोण आहेस ९ सांगबरें. सं०- मी कोणी तुझ्या सारखाच आहे. त- तर मग ऐक, सर्व प्रधानमंडळींत श्रेष्ठ जो माल्यवान १ शिव