पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक प्रसन्नराघवनाटका रा०- मूर्खा, तुला धिक्कार असो. ठाऊक नाही काय? उचलिला शिवशैल मुखें जिहीं ॥ सापक प्रबळ मद्भज युक्त न मी तिहीं।। जा शिवधनुष्य उभे करणे किती द्विभुज यास्तव दाखिवली स्थिती ॥४८॥ तर सांग को जानकी आहे ती - मं०- (खिन्न होऊन आपणाशी ह्मणतो.) लिस आर्या. मुनि याज्ञवल्क्य कुलगुरु जनक पिता भू जिची असे माता। ती दुर्दैवें पडते राक्षसहस्ती अहा कशी सीता ॥४९॥ -न- (त्रासून ह्मणतो. ) इतक्या वीरांमध्ये असा कोणी नाही, की ह्या दांडग्याच्या आंगावर धावून जाईल. मं०- रागावलेल्या रावणाच्या समोर सहस्त्रार्जुनाशिवाय | कोण दुसरा राजा जाणार आहे ? न.- (आनंदाने ह्मणतो.) आपण आतां जगलो. पहा, पहा, कतवीर्याचा पुत्र सहस्त्रार्जुनच हा आला. मं०- छे, मूर्खा ! तो सहस्त्रार्जुन तर परशुरामाने मागेंच मा. रून टाकला. तो आतां कोठे आहे ? तर खचीत बाणासुर असेल. अरे नूपुरका, हा बाणासुर असला तर दुसरा हा अनर्थच प्राप्त झाला. (पुनः विचार करून ह्मणतो.) हे झाले हैं बरेंच झाले, कां की विषाला विषच औ• षध पाहिजे. ( तदनंतर बाणासुर पडद्याच्या बाहेर येऊन हिकडे तिकडे फिरून डौलाने ह्मणतो.) श्लोक कैलास दुर्घट मुळी उचलावयास ॥ रुसत्याहून फार जड शैव धनुष्य यास -