पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२० प्रसन्नराघवनाटक अक१ नू०- मित्रा मंजीरका, पाहा चमत्कार, की एका मनुष्याला दाहा मस्तकें. मं०- हा मनुष्य नव्हे, तर हा राक्षसराजा रावण आहे. नू०- तर मित्रा, आता मला संभाळ; सामान्य राक्षसाच्या ही समोर मनुष्य आला, तर तो त्याला खातो; मग हा तर रा. क्षसराजाच आहे. मं०- अरे, भिऊ नको. सर्व वीरमंडळी भाटलोकांचा मान ठेव. ते; तर त्रैलोक्यांतला अद्वितीयवीर असा हा रावण आ. मांशी कशी वाईट वर्तणूक करील. नू.- (आनंदाने ह्मणतो. ) जर असें आहे, तर निर्भय होऊ. न ह्याला काही विचारतों. (असे ह्मणून पुढे सरतो, आणि ह्मणतो.) अरे, तूं कशासाठी इतकी मस्तकें बाळगली आहेस? ह्यांतून एक ठेवून बाकीची कोठे तरी टाकून देईनास. रा- अरे दुष्टा, कसा 'अप्रसंगी शिरश्छेदवातेने अशुभ सुचिव. तोस ९ तूं भाट आहेस, ह्मणूनच तुझी उपेक्षा करतो. म.- (हंसून ह्मणतो.) बरें तर, प्रसंगी शिरश्छेद वार्ताही त. ला मंगलदायक आहेना ? रा- ह्यांत काय संशय! अरे. ऐक. श्लोक सुरस्त्रिया ज्यावर वर्षतात ॥ कल्पद्रुमांची कुसुमें अनंत ॥ अशा शिवाच्या चरणी रणींवा ।। छिन्न मन्मस्तकपुंज व्हावा ॥४७।। नू- जर तूं असा आहेस, तर आपले स्वरूप झांकून चोरासारखा का आलास ? १ भलत्याप्रसंगी.