________________
प्रसन्नराघवनाटक अंक १ नू.- होय, याज्ञवल्क्य ऋषीच्या द्वितीयपत्नीने. मं०- (आनंदाने ह्मणतो.) आता माझ्या मनाची खात्री झाली; ती देवी मैत्रेयी योगाभ्यासांत पूर्ण आणि त्रिकालज्ञानी आहे, तेव्हां मिथ्या लिहिणार माही. न0- सर्व घडण्यासारखे आहे, परंतु हा थेर्डा पलीकडे सरेल तर. .मं.- अरे पुरुषा, तूं इकडे तिकडे काय पाहातोस ९ हैं शिव धनुष्य आहे तर इकडे सच दृष्टि दे. पु०- ह्यांत काय बोललास. मुष्टीही तिकडेच देतो. (इकडे ति. कडे फिरून मुगुट पडल्या सारखें दाखवून खेदयुक्त पाहात आहे तो.) मं०- अरे दशमुख दिशांकडे पाहणे पुरे. मुगुट पडला तर प. डूंदे. वेळ चालली, लवकर उचल हे शिवधनुष्य. पु०- (मनांत ह्मणतो.) ह्याने मला कसें बरें ओळखले? अथवा | भुंगा लाकूड कोरतांना जशी अक्षरें निघतात त्याप्रमाणे हा शब्दाचा सारखेपणा असेल. मोठ्या डौलाने उघड ह्मणतो.) श्लोक. सहज च उचलून कांबटीला ॥ अळसत चढवून ही गुणाला ॥ शशिधरधनु कर्षिले बघारे ॥ रिपुजनमन ही तसें च सारें ॥ ४२ ॥ (धनुष्याला हात लावून मनांत ह्मणतो.) अरे, हे हालत दे. खील नाही. ( मोठ्याने झणतो. )अरे, धनुष्य हे वांकडे, तर वांकडा मार्ग सोडून सरळ जो तरवारीच्या धारेचा मार्ग तेणेकरूनच सीतेला आणतो. मं०- कसारे फार बडबडतोस, पाहात नाहींस काय ? १(शशिधर ) शिव