पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मार.१८ अंक १ प्रसन्नराघवनाटक १५ झांकावयाचें तेच उघडे करावयाला लागलो. असो, काहीं. तरी युक्ति करून हे झांकतो. मग उघडपणाने ह्मणतो.) दश दिशांचे ठायीं ज्याची कीर्ति पसरली आहे, व ज्याचें नांव त्रिभुवनवीर अशा मला ही विहिरीतला बेडूक जसा समु., द्र माहीत नाही ह्मणतो, त्याप्रमाणे तूं बोलतोस, तर दाखी. व आतां तें कांबीट आणि कन्या कोठे आहे ती. मं०- अगोदर हे धनुष्य पाहा मग कन्यारत्न नजरेस पडेल. पु.- ( मोठ्या डौलाने ह्मणतो. ) मूर्खा, जोशी राशि नक्षत्रे सांगत असतात ती तुला गऊक नाहीत काय ? ते तर पहि ल्याने कन्या, आणि मग धनु असे सांगतात, मं0- (आपल्याशी झणतो.) अरे, कसा हा बहुभाषपणा दाखवितो. असो, तर त्याच रीतीने त्याचे निवारण करतो. ( मग उघडपणे म्हणतो. ) अरे, इतक्या शूर मंडळींत तूंच नक्षत्रविद्याकुशल आहेस. पु०- (रागाने ह्मणतो. ) अरे, मीच क्षत्रविद्येविषयी अकुशल आहे काय RESISTRom मं०- तर मग कसा धनुष्य उचलल्याशिवाय कन्या पाहण्या ची घाई करतोस । पू.- (डौलानें इकडे तिकडे फिरून ह्मणतो.) माझाही धन व्य उचलण्याविषयी संशय आहे काय ? मं०- आहेच. पु०- ( सीतेकडे दृष्टि जाऊन ह्मणतो.) तर मलाही हा संश. य आहे. श्लोक मेघाविना गगन भूषण वीज काय ॥ होते कधी कनककांतिसमानकाय ॥