पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १ प्रसन्नराघवनाटक न०- जडावाचे अलंकार घालून त्यांकडेच पाहातो आहे हा कोण Prisorry मं0- अरे, हा कांचीनगरांतला वीरमाणिक्य नांवाचा राजा. न०- रत्नाची कुंडलें ज्याच्या गालांवर हालत आहेत आणि जवळच्या राजाबरोबर गोष्टी सांगत बसला आहे हा कोण ? मं0- अरे, हा महान योद्धा मत्स्यराज राजा. न.- अंगाला चंदनाची उटी लावून शिवधनुष्यावर हात ठेवू. न बसला आहे हा कोण ? मं०- हा समुद्रासारखा गंभीर सिंधराज राजा नूपुरका आतां हे पुरे, आपण प्रस्तुत कार्याला अनुसरूं. ( भोवताली फिरून मोठ्याने गर्जना करून हाणतो.) रा. जेहो, ऐका, श्लोक आकर्षील नृपाळ शैवधनुच्या दोरीस कर्णातिकी ।। जो त्याला च वरील भूषित कटी ही जानकी सत्य की॥३२ (पुन्हा कौतुकानें ह्मणतो. ) मित्रा, हे राजे पहा. श्लोक भालहस्त धनुकर्षणकौतुकानें ॥ रोमांचयुक्त बघ दुप्पट आकृतीने ॥ राजे विशाळ त्वदयी दिसतात सारे ।। Po सीताकरग्रहणकौतुकेयोगपूरें ।। ३३ ।। (पुन्हा आनंदाने ह्मणतो. ) हे राजे एकदम कसे उ. ठले, आणि गर्दी झाल्यामुळे चेंगराचेंगरी किती चालली आहे ती पहा.