पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२ प्रसन्नराघवनाटक अंक १ आहेत, त्यांचे वर्णन करण्यासाठी जनक महाराजानी आ. झांस आज्ञा केली आहे ( दाल्भ्यायन ह्मणतो.) वा! भूगा, लांकुड कोरूं लागला ह्मणजे जशी कांही अक्षरे निघतात तशी ही गोष्ट झाली. अमरांना जे बोललों ते ह्या भाटांना लागू झाले. असो, हा सर्व श्रमरांच्या भाषणाचा प्रकार या. ज्ञवल्क्य गुरूजीना निवेदन करावा. (असें बोलून निघून जा. तो. ) ( नंतर ते दोघे भाट पडद्यांतून बाहेर येतात. त्यांत. ला एक ह्मणतो.) मित्रा मंजीरका, अंगाला केशराची उटी लावून हस्तिदंताच्या मंचकांवर हे राजे किती डौलानें बस ले आहेत, पहा. मं०- गड्या, नूपुरका पहा. साधून नीट नृप आत्मदिशा सभेत । सिंहासनावर कसे स्थित शोभतात ।। सीतास्वयंवरविलोकनकौतुकानें ॥ दाहीहि काय जमल्याच दिशा मुखाने ॥ ३० ॥ श्लोक शिवधनु उचलाया इच्छिणाच्या नृपांची ॥ अतिचपळच वृत्ती नाचते की मनाची । स्वकरचलित सूत्री नाचवी सूत्रधार । अतिकुशल जशी ती बाहुली शीघ्र फार ॥ ३१ ॥ नू०- आपल्या बाहुदंडाकडे पाहात बसला आहे हा कोण ? मं०- हा मल्लिकापीड नांवाचा राजा ह्याची कीर्ति भागीरथी. सारखी निर्मळ आहे. नू- सोन्याची कडी मागें सारून हातांकडे पाहातो हा कोण? नं0- हा उत्तर दिशेकडला कर्पतिलक नांवाचा राजा,