पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११ अंक १ प्रसन्नराघवनाटक दा.- (बरें, आतां मधुप्रिय काय वर्तमान सांगतो ते ऐकू). म.- मी इंद्राच्या नंदन वनांतून आलों; नवीन वर्तमान ह्मणशील तर तेथें एक रावणाकडील राक्षस किंकाळी फोड़न बोलत होता, की अरे नंदनवनाचे रखवालदार हो, अद्यापि रावण महाराजानी चंद्रमौलीची पूजा केली नाही, आणि बागेत तर एकही फूल दिसत नाही, तेव्हां फुलें कायरे झाली १ मग त्या रखवालदारांनी त्याला असे सांगितले, की आज जनक राजाच्या कन्येचा स्वयंवर होणार आहे, तो पाहाण्याला सर्व देव तयार झाले आहेत, तेव्हां त्यांच्या विमान शोभेकडे फुलें खरचली. ते ऐकून हेच वर्तमान रावण महाराजास नजर करावे असें मनांत आणून तो राक्षस तिकडे गेला; आणि मीही चमत्कार पाहाण्यासाठी इकडे आलो. दा.- (खिन्न होऊन ह्मणतो. ) ज्यापक्षी हैं सीतास्वयंवराचें वर्तमान रावण आणि बाणासुर ह्यांच्या कानी पडले, त्याप. क्षी हे अनर्थाचें बीजच आहे. अथवा भ्रमरांच्या बोलण्याचा खरेपणा काय मानावयाचा आहे. (विचारकरून ह्मणतो.) खरेपणा कां नमानावा, पहा. मकरंदरसासमान येते॥ अमरांच्या वदनामधून जें तें ॥ रमणीय असोन तोष देते ॥ स्तुतिपाठासम भासतें श्रुतीतें ॥ २९॥ (पडद्यांत ) ऋषीश्वरा, खरें जाणलेस आह्मी दोघेही भाटच आहों. येथे स्वयंवरासाठी देशोदेशींचे राजे मिळाले १ बंदीजन ( भाट ) २ कानाते