पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/164

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ७ प्रसन्नराघवनाटक १५९ सूर्याचे कर पंकजें विकसिती प्राचीस आलिंगिती आणि ध्वां'त पिती जगी पसरती सर्वांस आनंदिती ॥ ७६ ।। ल.- आर्या होतो उदय रवीचा झाला संयोग चक्रवाकांचा ॥ कमलवनावर होतो अपरांचा शब्द आणि हंसांचा ॥ ७७ ।। बि श्लोक सूर्याच्या उदयें गेलें तम देशांतराप्रती ॥ अनेक कार्य घडतो वर्णाया न पुरे मती ॥७८॥ रा.- प्रिये जानकी, हा सूर्योदय झाला तरी तुझ्या मुख _चंद्राचें तेज कमी झाले नाही. सी०- हा कमलिनीनाथाचा उदय झाला काय? रा.- अगे जानकी, पहा. आर्या फिरती जिच्या तरंगावर हंसांची कुळे सरव विमळ ।। ती ही प्रख्यात नदी आली भागीरथी पहा जवळ ॥७९॥ सी०- (पाहून आनंद पावते. ) रा- (आनंदाने ह्मणतो. ) वन्सा लक्ष्मणा ही सरयू नदी __आणि ही अयोध्या पहा. ल.- (आनंदाने ह्मणतो.) हे वसिष्ठ गुरुजी भरताला बरो. बर घेऊन आपणाला अभिषेक करण्यासाठी येऊन वाट पाहात बसले आहेत, तर आपण आतां पुष्पक विमानांतून खाली उतरावे. १०- वत्सा अमळ थांब मी सूर्याला नमस्कार करतो . ( हात जोडून ह्मणतो.) १ अधकार.