पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/161

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५६ प्रसन्नराघवनाटक अंक ७ रा.- हे असे तुच्छ भाषण काय बोलावें! बि.- महाराज, सुग्रीव बोलला, की पृथिवी शुभ्र करून टा. किली, तर हे भाषण तुच्छच खरें कांकी, आपल्या कीर्तीने त्रैलोक्य शुभ्र करून टाकिलें आहे. रा.- अरे लंकेश्वरा, तुझीही वाळीसारखीच दशा झाली, ल०० (सीतेला ह्मणतो.) श्लोक लंघून चालला चंद्र आकाशास दिसे तसा ॥ लंघी सुग्रीवसचिव हनूमान् सागरा जसा ॥६८॥ सी०- अरे लक्ष्मणा, तो हनुमान आतां कोठे गेला ९ . ल- मातोश्री, आमी लौकरच तुझ्या भेटीला येतो हे भर. ताला कळविण्यासाठी रामचंद्रांनी त्याला अयोध्येस पाठ. विले आहे. सी०- तर मग आपणाला अयोध्येस जाण्याला अजून किती अवकाश आहे ? (रामचंद्र बिभीषणाच्या मुखाकडे पाहतो.) (बिभीषण जाऊन आल्यासारखे करून ह्मणतो.) महाराज हें पुष्पक विमान तयार आहे; आतां ह्यांत बसावें. ( मग सगळे त्या पुष्पक विमानांत बसतात.) (रामचंद्र पाहून कौतुकानें ह्मणतो. ) अरे त्रैलाक्यांतला अद्वितीय वीर जो रावण त्याने, जे कुबरापासून आणलें तेंच हे पुष्पक वि. मान काय? ल.- (रागाऊन ह्मणतो.) त्याला वाळीने आणि सहस्रा. र्जुनाने युद्धांत जिंकिले असून त्रैलोक्यांतला अद्वितीय वीर असें कसें ह्मणतां १