पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१० प्रसन्नराघवनाटक • अंक १ तें. (पाहून ह्मणतो.) विण्याच्या शब्दासारखा शब्द ऐकून मी प्रांतीत पडलों. अरे, हे दोन अमर गुंजारव करीत आहे. त ( कानोसा घेऊन आश्चर्य वाटून ह्मणतो. ) योगीश्वर याज्ञवल्क्यऋषीचे काय सामर्थ्य आहे हो! ज्याच्या कृपेनें पक्ष्यादिकांच्या भाषाही मला समजतात. बरे, हे भ्रमर परस्पर काय बोलतात ते ऐकावें. ( कानोसा घेतल्यासारखें करून ) एक बोलतो, मित्रा कलालापा, कोठून आलास १ दुसरा ह्मणतो, मित्रा मधुप्रिया, शिवाच्या मस्तकावरील गं. गेंतलें प्रफुल्लित में चंद्रविकासी कमळाचें वन तेथून आलो. दा- वा! ह्यांचे भाषण किती गोड व नावेही काय चमत्कारीक आहेत हो. ( पुन्हा कानोसा घेऊन ) बरें हा मधुप्रिय, कलालापाला काय विचारतो १) म०- कलालापा, काही नवीन वर्तमान आहे काय ? - क०- कांही आहे, आतांच बळीचा पुत्र बाणासुर शिवाची पूजा करून हे विचारीत होता. आर्या कैलासापेक्षां ही सांगा भूमंडळी दृढपदार्थ ॥ जेथें दशशत मकर कंड़ते शमवितीलच यथार्थ ॥ २७ ॥ नंतर हंसून शिवाने त्याला असे सांगितले. - आर्या माझें धनुष्य आहे जनकनपाच्या घरी सुरेंद्र 'नुत । ज्याच्या शराग्निमध्ये पतंग झाली तिन्ही पुरेत्वरित ॥२८॥ ते ऐकून लागलाच तें धनष्य पाहाण्यासाठी तो इक. डेच आला. मीही त्याच्या पाठोपाठ आलो. बरे, आतां तूं कोठून आलास; आणि तुझ्या तिकडे काय नवीन वर्त. मान झाले असेल ते सांग.. १ (नुत ) स्तविले ले