पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५३ अंक ७ प्रसन्नराघवनाटक हा माझा निजभक्त यास्तव शिवें जी मस्त कस्छा कळा चंद्राची खरडून एक तुकडा की रावणाला दिला ॥५६॥ (पुन्हा आश्चर्य वाटून हंसून ह्मणतो.) ह्या रावणाची मनोवृत्ति किती चमत्कारिक आहे ! TET आर्या छेदी मस्तक राघव जों जो भेदी न रावणोरात - तो तो त्दृदयीं याच्या सीतासंभोगवासना शिरते ।।५७॥ (पडद्यांत ) FE आयोगका कां खेळतोस रामा मर्मी शर एक मार जीव हर ॥ पूर्णमनोरथ आह्मां कर कीर्तीने जगत्रयास भर ॥५८।। वि.- रावणाला मारण्याविषयी रामाला देव त्वरा करीत आहेत. ते ऐकून आतां रावण काय बोलेल ते ऐकू. (पडद्यांत ) अरे, माझ्या भुजानों, मी सांगतों तसे करा. श्लोक टाकून शंकरशिरस्थ कळा शशीची. रत्नें हरा सकलदिक्पतिमस्तकींची ! ती ही करो जनकजा कटिभूषणातें गावो तदीय 'सुरवें मम विक्रमातें ॥५९॥ वि.- (हंसून ह्मणतो.) अरे लंकेश्वरा, आतां आपल्या भु जांलाच ज्यापक्षी आज्ञा केली, त्यापक्षी तूं मोठा समय चतुर आहेस; कांकी, आतां भुजांशिवाय दुसरा परिवार राहिला. च नाही. ( पाहून ह्मणतो. ) अरे, हा रामचंद्र रावणाच्या बोलण्याने किंचित् रागावल्यासारखा दिसतो. (पुन्हा हाण. तो.) शिव शिव ! काळाची गति किती दुर्धर आहे हो! १ त्याच्या २ चांगल्या शब्दाने