Jump to content

पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ प्रसन्नराघवनाटक १४७ शिवशिव कठिणमनाचा जगला यास्तवच अल्पकाळ जरी।। वत्सा शिवाय रे हा राम कसा निजपुरी प्रवेश करी ॥३४॥ वि.- अरेरे, ही तर केवळ करुणासमुद्रालाच भर्ती आली आहे. (विचार करून ह्मणतो.) बरें, ह्याचा परिहार कशानें होईल ? ( पुन्हा ह्मणतो. ) परिहाराची गोष्ट बोलावयालाच नको कांकी प्रारब्धच उलटे झाले आहे. वि०स्त्री- अगदीच उलटे झाले आहे असें ह्मणा, कां ह्मणाल तर पहा इकडे हा एक वानर रावणाकडे फितून हातांत मोठा दगड घेऊन रामाच्या समोर चालला आहे. लहान वि.- ( कानावर हात ठेवून ह्मणतो.) शिवशिव अगे असे भलतेंच बोलूनको, हा तर श्लोक महौषधींचा आधार गंधमादन भूधर ।। घेऊन लक्ष्मणप्राणत्राणा मारुति येतसे ।। ३५॥ (पुन्हा पाहून आनंदाने ह्मणतो.) आर्या sesi दिव्यौषधिगंधाने लक्ष्मण उघडून नेत्रकमलांते ॥ चढवून धनु पुन्हा ही पूर्णमनोरथ करीच रामातें ॥३६॥ वि०स्त्री- रामा बरोबर लढण्याच्या हेतूनें पुन: रावण येत आहे. मारुEPTEके वि.- प्रिये, तर मग आतां लक्ष देऊन पाहा, कांकी, हे दोघेही वीर बराबरीचे लढणारे आहेत. वि०स्त्री- रामचंद्र तर त्रैलोक्यांत अद्वितीय वीर असा गाज. तो आहे, आणि रावणाचा तर पराभव पुष्कळांनी केला आहे; तेव्हां त्यांची बरोबरी कशी होईल ९ मजा वि.- प्रिये, तूं रावणाला ओळखत नाहीस काय ?