पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ७ प्रसन्नराघवनाटक वि. स्त्री-बरें, हा त्याच्या समोर काजळाच्या डोंगरासार. वा काळा वानर येत आहे, हा कोण ? वि०- हा लढाई करणारा नीळ नामक वानर आहे. ( पाहून चकित होऊन ह्मणतो. ) अहो.. श्लोक नीला'चलाचा शिखरप्रहार वक्षस्छली नीळ करी मुघोर ॥ त्यातें प्रियस्त्रीकृतपंकजाचा प्रहार मानी पति राक्षसांचा ॥ २७ ॥ ( पुन्हा कौतुकानें ह्मणतो. ) पहा पहा. आर्या हा नील दशमुखाच्या हस्ताब्जी अमरतुल्य शुद्ध दिसे।। दाही मुगुटांवर ही फिरतां जो इंद्रनीलमणि भासे ॥२८॥ वि० स्त्री- रावणाशी फार झटून युद्ध करतो, हा कोण बरें ? वि.- हा रामाचा पक्षपाती बिभीषण आहे. (पुन्हा खिन्न होऊन ह्मणतो.) अरेरे! ent आर्या करें बिभीषणावर लंकेशें शक्ति सोडिली क्रूर ।.. निजकांतेपरि लक्ष्मण तिजला त्दृदयीं धरी महाशूर ।।२९॥ वि०स्त्री- शिव शिव ! श्लोक सर्वांगावर बाण वर्षत असे हा रावणाच्या जसा अंकी मूर्छित लक्ष्मणावर पहा नेत्रांबु वर्षे तसा ॥ दृष्टीतें मुखशोकचंचल अशा त्या वानरांच्या करी सीताकांत समर्थ वीर करुणा दोन्ही रसां आदरी ॥३०॥ १. ( अचल) पर्वत