पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रसन्नराघवनाटक अंक ७ रा- (खिन्न होऊन ह्मणतो.) बरें, हा पुढे काय सांगतो बरें। दशरथ'तनयानीच्या स्पर्शे झाली दशा पतंगाची ॥२५॥ (मंदोदरी आणि रावण मच्छित होऊन पडतात.) प्र०- महाराज, सावध व्हा सावध व्हा. रा०- ( सावध होऊन ह्मणतो.) प्रिये मंदोदरी सावध हो. मं०- ( सावध होऊन ह्मणते. ) महाराज आतां मला सां. भाळा; मी शोक समुद्रात बुडाले आहे. रा०- अगे मंदोदरी तूं भिऊ नको, ही माझी तरवारच तुझा शोक दूर करील. (पुन्हा उठून हातांत तरवार घेऊन ह्मणतो. ) पहा आतां ही माझी तरवार.. REPOpe आयाँ उन्मत्त 'मुरगजांचे मस्तक फोडून मौक्तिकें उडवी॥ जी ती राक्षसनेत्रां आनंदाब्धीत ही पहा बुडवी ॥ २६ ॥ (असे बोलून प्रहस्त प्रधानाला बरोबर घेऊन निघून जातो.) मं०- वा: काय चमत्कार पहा हा, विद्याधर आणि ही त्या ची स्त्री विद्याधरी ही दोघे हा युद्धसमारंभ पाहून आश्वर्ययुक्त होऊन काही विचार करीत बसली आहेत. आसो, मी महाराजांस जयप्राप्ति व्हावी ह्मणून आपल्या कुलदेवतेची पूजा करण्याला जाते. (असें बोलून मंदोदरी ही निघून जाते. वि.स्त्री०- हातावर रोमांच उभारले आहेत, असा हा वानर सैन्यांत कोण चालला आहे ! वि०- हा युद्धासाठी रावण चालला आहे. १ (ननय ) पुत्र २ (सुर ) देव