पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक प्रसन्नराघवनाटक PM आर्या. xचोर कवी वेणी हा X मयूर कुंडल मुहास्य हा Xभास ॥ कवि जन कुलगुरु, दिसतोजीचा हा कालिदास सुविलास २४॥ xहर्षच हर्ष असे हा त्दृदयस्थित 'पंचबाण बाणकवी ।। कविता वनिता वदरे, कोणाच्या मानसी सुख न पिकवी ॥२५॥ श्लोक न ब्रह्मविद्या नच राज्यलक्ष्मी ॥ तशी जशी ही कविता कवींची ।। सर्वोत्तमी अर्पण मात्र होतां ॥ चित्तास कन्येसम सौख्य देते ॥ २६ ( पडद्यांत ) शाबासरे गायका शाबास. सू०- हा याज्ञवल्क्य ऋषीचा प्रियशिष्य दाल्भ्यायन ऋषी इकडेच येत आहे, आणि हा शूद्राकडे पाहात नसतो, तेव्हां त्याच्या नजरेस पडणे हे नीट नव्हे; तर चल दुसरे ठिकाणी जाऊं. (असे बोलून नट आणि सूत्रधार निघून गेले ) (नंतर दाल्भ्यायन ऋषी पडद्यांतून बाहेर येऊन कांही अभिप्रायपूर्वक बोलतो.) अरे, हा बोलला हे चांगले बोलला, कांकी हा जनकाराजा सर्व लोकांमध्ये जो शूर आणि सुंदर असेल त्यालाच आपली कन्या देण्यास इच्छितो, आणि ह्या नादामुळे आमच्या गुरूंनी ज्या ब्रह्मविद्येचा उपदे. श केला आहे, ती व कुल परंपरेने मिळाली जी राज्यलक्ष्मी, ह्यांकडे फारसे लक्ष्य देत नाही. (कानोसा घेतल्यासारखें करून ) अरे हा आकाशांत वीणा वाजतो आहे, तेव्हां आमच्या गुरूंच्या दर्शनाला नारदमुनी येत आहे असे वाट. १ काम+ हे चिन्ह ज्या शब्दांवर आहे तितके शब्द कवींची नावे आहेत.