पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ७ प्रसन्नराघवनाटक १४.१ तर आतां भ्याले पाहिजे, आणि हे अरिष्ट टळण्याचा 1 यत्न केला पाहिजे. रा.- अरे, ह्यांत भ्यावयाचें तें काय, आणि ह्याचे निवारण करणे ते काय ? आर्या मदोदरीपदींचा नूपुरमणिशब्द जेवि अति मधुर ।। त्यापरि कपिकोलाहल मच्चित्ता तोषवीच हा 'प्रचुर ॥१५॥ ( इतक्यांत मंदोदरी पडद्याच्या बाहेर येऊन ह्मणते ) महा राजांचा जय असो. ग.- अगे प्रिये, येथे बसावें. ( मंदोदरी बसून अधोमुख होते.) APRIMAआर्या ज्यावर कुरळे केश स्मितयोगें चंद्रबिंब तुच्छ करी ॥ कमळांच्या कातीतें निजदृष्टीनेच जे सुरेख धरी ॥१६॥ ज्याचे दर्शन घ्याया देवांचा ही झटे सदां सार्थ ॥ कांकरतेस अधः कृत माझ्या परि मुमुखि क्या मुखा व्यर्थ।। १७॥ प्र०- महाराज, ही वानरांची गर्जना ऐकून मनाला चिंता प्राप्त झाली आहे, ह्यासाठी बाईसाहेब अधोमुख झाल्या, अ. से मला वाटते. रा०- अरे त्यांत चिंता करण्या सारखे काय आहे १ श्लोक हे अंगदादि कपि सर्व जरी मिळाले माझ्या पुढे'हरिपुढे मग जेवि आले ।। मुग्रीव हा नृप असे कपिमंडळाचा माझ्यापुढे वद पराक्रम काय त्याचा ॥१८॥ १ पुष्कळ. २ समुदाय ३ सिंहापुढे.