पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रसन्नराघवनाटका अंक ७ या खेळोत तुझ्या जळांत मकरी स्वछंद लंकेश्वर । स्त्रीगंडस्थल पत्रभंग मकरीनाशील याचा शर, ॥१२॥ रा- दुसरी वाच. प्र०-वाचतो. काही श्लोक तूं आलास बिभीषणा शरण हे जाणून चित्ती पहा लंकाराज्य तुला समर्पण करी श्रीराम आतांच हा ॥ सुग्रीवा कपिराज्यदानकरते जामीन ज्याचे कर ह्या कृत्यास तसेच साक्षि अवधे आहों आझी 'किंकर ॥ १३॥ रा०- अहो ह्या धाकट्या तपस्व्याच्या बोलण्याचा कोरडा डौल किती आहे ! हे राहूंदे, पण हे समुद्रामध्ये काय दि. सते आहे ? प्र०- हा वानरांनी डोंगरांवरचे मोठमोठाले दगड आणन बां धलेला सेतु आहे. रा०- अहो हा चितारी फार कुशल आहे; कारण ह्याने हे सर्व खोटे असून खन्या सारखें लिहिले आहे. प्र.- अजून ही आपणाला हे खोटेंच वाटते काय ? (पडद्यांत मोठा गलबला होतो. ) रा.- हे काय आहे ? श्लोकमा गर्विष्ठ उन्मत्त बलाढ्य जे असे त्या वानरांचा रव घोर हा असे ।। पर्जन्यकाळी नव मेघ गर्जती ते वानरानां उपमान शोभती ॥ १४ ॥ १ (गंडस्थल ) गाल२ (पत्रभंग) वेल ३ (मकरी ) मासे ४ दास प्र०