पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रसन्नराघवनाटक अंक ७ परंतु जात्याच सुंदर त्यामुळे माझे नेत्र ओढून घेते हे यो. ग्यच आहे. आर्या - 2 प्याले चंद्रकलेची कांति दिवाकर गभस्ति सर्व जरी ॥ मळकट असून नेत्रां बघतां सानंद ती न काय करी ।।१०।। प्र.- महाराज, हे चित्र पाहा झणजे मनाला आनंद होईल. रा- एथें हैं काय लिहिले आहे ? प्र०- एथे हा गर्जना करणारा समुद्र लिहिला आहे. त्यांतले. च हे मासे आणि कांसवें इत्यादिक जलचर दिसत आहेत, आणि त्याच्याच ह्या मोठ मोठ्या भयंकर लाटा उसळत आहेत. रा०- (समुद्राकडे पाहून ह्मणतो. ) बरें समुद्राच्या उत्तरतीरी तमाल वृक्षांच्या झाडीमध्ये हजारों इंद्रधनुष्यांसारखे चित्रवि. चित्र दिसते, हे काय आहे ? प्र.- हे सुग्रीव संरक्षित वानरमंडल आहे. रा०- (हंसून ह्मणतो.) अरे वालिसंरक्षित असें ह्मणावया. चे, असो मला, त्याशी काय करावयाचे आहे. बरे हे दोघे धनुर्धारी दिसतात हे कोण? प्र.- हे राम लक्ष्मण आहेत. या दोघांपैकी वडील भाऊ जो राम त्याच्या बाणाने वाळी मरण पावला ह्मणून सुग्रीव हल्ली वानरांचा अधिपति झाला आहे. रा.- ( न ऐकल्या सारखे करून ह्मणतो.) बरें, फार रोड अ. सून सुंदर आणि समुद्राच्या काठी निजलेला आहे तो कोण ? प्र.- हा लंकेत येण्यासाठी आलेला राम आहे. समुद्रह्माचा कुलगुरु ह्मणून स्याजवळ लंकेंत येण्याचा मार्ग मागावया. सागं तो दर्भ पसरून निजला आहे. (गभस्ति) किरण