________________
प्रसन्नराघवनाटक अंक आर्या क्रोधे दशाननाने नीतिज्ञ बिभीषणास मात्र नहा ॥ लताप्रहार केला तर निज विभवास ही असें च पहा ॥५॥ ऋ०- बरें, पुढे काय झाले ? क०- मग काही राक्षस बरोबर घेऊन रावणाचा परित्याग DE करून बिभीषण रामचंद्राला शरण गेला. ऋ०- ( मनांत मणतो. ) एकूण पुलस्त्य ऋषीच्या उपदेशा. चे रहस्य होते, ते बिभीषणाने पूर्वीच जाणलें. (मग उघड विचारतो.) बरें, आतां तूं काय करणार आहेस ? क.- मला रावणाच्या माल्यवान प्रधानाने अशी आज्ञा केली आहे, की सीता वश होत नाही त्यामुळे रावण विव्हळ झाला आहे; तर त्याच्या मनाला चैन पडण्यासा. ठी एका चिता-याने एक चित्रांचा पट तयार केला आहे, तो रावणाला नेऊन दाखीव, तर मी तो पट न्यास नेऊन दाखविणार आहे. ऋ०- (विचार करून ह्मणतो.) रावणाचा शत्रु तर लंकेच्या जवळ येऊन पोचला, आणि माल्यवान् प्रधान तर हा उप. चार करण्याला पाहतो, तर ही गोष्ट प्रस्तुत कार्याला उपयो. गींच असेल ! ( पडद्यांत ) श्लोक चंद्राचीच करा सहाण वर हा घांसा अरे चंदन चंद्राच्याच करा करा जलद रे बांधून चौरी घन ॥ पाण्याचे कण शोभती कमलिनीपत्रस्छ त्यांचा करा पद्माच्या बिस तंतुनीं ग्रथितही रे हार मोठी स्वरा॥६॥ ऋ.- ( उपहास पूर्वक मनांत ह्मणतो. ) ह्या प्रसंगी रावणा चा हा शीतोपचार तयार होत आहे; परंतु ह्यांत सीत. कार्य चांगले होईल. (मग उघड ह्मणतो.) सीता वश न