Jump to content

पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ७ प्रसन्नराघवनाटक १३५ आर्या परिणामी मुख व्हावे ही इछा ज्यांस ते चतुर्थीच्या ॥ चंद्रकलेपरि सज्जन विलोकिती नच मुखा परस्त्रीच्या ॥१॥ ऋ०- राजाजवळ विनंति करण्याविषयी बिभीषणाचे काय चातुर्य हो ! बरें, पुढे काय झालें । क०- मग रावण हंसून असे बोलला, की हे कोणा तरी भित्र्याचे भाषण आहे, प्रसिद्धच आहे, की श्लोको परस्त्रियांच्या हृदयीं ॥ शत्रंच्या गजमस्तकी॥ पडतात न भीरूंच्या ॥ दृष्टिशा शरवृष्टिही ॥ २ ॥ समग बिभीषणाला वाईट वाटून थोडा रागही आला, मा. णि तो रावणाला असें ह्मणाला की. श्लोक. मोठी कीर्ति 'सुरापगा पसरली लोकत्रयी निर्मला रामस्त्रीअभिलाष कां दशमुखा चित्ती तुझ्या मातला ॥ * जे विस्तीर्ण पुलस्त्यवंशयश हे लोकत्रयी चंद्रसे तूं झालास कळं कसा शिव शिव त्याला असे हे दिसे ॥३॥ ऋ०- (आश्चर्य युक्त होऊन ह्मणतो. ) बरे, पुढे काय झालें। क.- नंतर. आर्या क्रोधे रक्तविलोचन रावण उचलून तीव्र खड्ग करी ॥ जोनातिज्ञ बिभीषण त्याच्या दृदयी पदप्रहार करी. ॥४॥ ऋ०- शिव, शिव, खचीत. ( सुरापगा ) गंगा.