पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रसन्नराघवनाटक अंक ७ - -- ( नंतर पडद्याच्या बाहेर पुलस्त्य ऋषीचा शिष्य येऊन चहूंकडे पाहून ह्मणतो.) अरे मला एथील माहीतगारी नाहीं; तर आतां बिभीषणाचा वाडा कोणाला विचारावा बरें । (पुन्हा पाहून ह्मणतो. ) अरे, जो रावणाचा मातामह व प्रधान माल्यवान त्याचा चाकर हा दिसतो आहे, तर ह्यालाच विचारावें. ( मग मोठ्याने ह्मणतो.) अरे करालका, इकडे ये, इकडे ये. (करालक पडद्याच्या बाहेर येऊन - ह्मणतो. ) हे ऋषे, मी तुला नमस्कार करतों. क.- तुझें कल्याण असो. बरें, करालका, बिभीषणाचा. वाडा कोठे आहे. त्याची मला खूण सांग. क.- कशाला ? ऋ०- त्या बिभीषणाला काही निरोप सांगण्यासाठी माझ्या गुरूने मला पाठविले आहे क०- तुझ्या गुरुचें नांव काय ? क-पुलस्त्य ऋषि. क०- मुळी बिभीषण एथे कोठे आहे ? ऋ- अरे, हे काय बोलतोस ! एथें नाही, तर बिभीषण कोठे गेला! क०- एकदां बिभीषण हातांत पत्र घेऊन रावणाला नम. स्कार करीत होता; इतक्यांत ते पत्र रावणाने घेऊन वा. चून पाहिले तो त्यांत अभिप्राय असा होता, की.