पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रसन्नराघवनाटक अंक श्लोक निज काव्यरसेंच तृप्त होती॥ पण काव्ये परकीय साधु गाती ॥ निजपुष्परसें अळे बुडालें ॥ पण तो कुंभजळेंच आन डोले ॥ २१ ॥ न०- वा! ह्या कवीचे भाषण फारच सरळ आणि कोमळ आहे. सू- कोठे कठीणपणा व कोठे वक्रपणाही आहे. न०- हे गुणही आनंद करणारे आहेत काय! सू०- होय. श्लोक. जो निदी नर वक्रउक्ति कविच्या तो मंदबुद्धी खरा ।। जैसा नीरस निंदितो युवतिच्या वक्रा कटाक्षांकुरा ।। सारासारविचारयुक्त जन तो वक्रासही आदरी ।। वक्राही निजमस्तकी शशिकला गौरीश तो कां धरी ॥२२॥ ( आणखीं) अमृतजलीनधीच्या दिव्य घेऊन नीरा ॥ जलधर जर वर्षे'तारकाकारगारा ।। तर मग उपमेला पात्र होतील चित्तीं ॥ क्षणकठिण कवींच्या गोड ह्या शब्दपंक्ती ।। २३ ।। न- अहो, ह्या कवींच्या मनांत काय विलक्षण आनंद भरला आहे हो ! त्यामुळेच तन्हेत-हेचे सरस आणि आनंदकारक सुभाषिताचे प्रकार उत्पन्न होत आहेत. सू- हे योग्यच आहे. १ नक्षत्रासारिख्या गारा.