पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३२ प्रसन्नराघवनाटक अंक ६ त्या रावणाच्या प्रिय अक्षपुत्रा मारून कोठे पळशी अमित्रा ॥ ६२ ॥ - आया रावण राजाज्ञेनें हस्ती शरचाप शीघ्र घेऊन ॥ हा मेघनाद आला तुजला मारावयास नेमून ॥ ६३ ॥ ह- हे देवि, ज्या कार्याला आलों, तें कार्य झाले, आतां व्यर्थ वेळ घालिवण्यांत हांशील नाही तर मी आतां निरो. प मागतों, आणि हा नमस्कार करतो, सी०- अरे वायुपुत्रा, ह्या राक्षसपुरींतून आणि समुद्रावरून नि विघ्न जा. ह.- हा देवीचा प्रसाद शिरसा मान्य केला. ( असे बोलून निघून जातो.) सी०- सखे त्रिजटे, तूं आकाशांत उभीराहून ह्या वायपुत्रा चे वर्तमान काय होतें तें पहा. त्रि०- बरें आहे. (असें बोलून ती पाहात बसते.) ( पडद्यांत) आर्या इंद्रजितें मुक्त असे जे शर ते झेलिले पवनत नये ॥ ( सर्वही आनंद पावतात.) ( पुन्हा पडद्यांत) बांधून त्यास त्याचे पेटविले पुच्छ राक्षसें अनयें ।। ६४ ॥", (सर्वही खिन्न होतात.) (पुन्हा पडद्यांत ) का त्याणे निज उड्डाणे लंकापुर जाळिलें क्षणांत पहा ॥ ( सर्वही आनंदखेदयुक्त होतात. ) ( पुन्हा पडद्यांत ) निजपुच्छवन्हि विझवी सागरनीरांत लेश दग्ध न हा॥६५॥ ( सर्वही आनंद पावतात.) (पुन्हा पडद्यांत ) हे तर फारच अद्भुत झाले. पहा, हा मारुति १ इदंजिन