पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ६ प्रसन्नराघवनाटक १३१ तुझ्या मुखेंदूस परंतु इछी प्राशावया जेवि जळास मच्छी ॥ ५९॥ ( मग चूडारत्न काढून हनुमंताच्या हातांत देते, आणि त्या चूडारत्नाला ह्मणते.) आर्या चूडारत्ना तुजला रात्रिचर दृष्टिदोष हा झाला ।। पण रामचंद्रतीर्थी स्नानाने दूर कर च तूं त्याला॥६॥ 10- हे देवि, माझ्या मनाला रामचंद्राचे चरणदर्शन घेण्या. ची त्वरा फार झाली आहे, तर मला जाण्याविषयी आज्ञा | असावी. सी०- ( डोळ्यास पाणी आणते, आणि ह्मणते. ) अरे बाबा हनुमंता, आतां तूं गेलास ह्मणजे पुन्हा रामचंद्राचें वर्तमान मला कोण सांगेल ? ह.- हे देवि, बरें स्मरण केलेंस; मी जेव्हां इकडे आलों ते. व्हां रामचंद्राने मला असे सांगितले की, तूं जानकीला हैं सांग. श्लोक आतां हा हनुमान तुला म मकथा सांगेल हे प्रार्थितों काही काळ धरून धीर न रडे मी सत्य हे सांगतों ।। की आतां दुसरा नको मम कथा सांगावयातें तुला र शास्त्रीरुदितें च लक्ष्मणधनुष्टंकार सांगो भला ॥ ६१॥ ( पडद्यांत) श्लोक दुष्टा अरे वानर जातिनीचा आला पहा बंधु वडील त्याचा ।। १ माझी २ ( रक्ष ) राक्षस