पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रसन्नराघवनाटक अंक ६ हं.- शत्रुक्षयकरणारें देही त्याच्या वसे विपुल धाम ॥ ५४ ॥ सी०- आतां थोडा जीवांत जीव आला. ह.- हे देवी सीते, राम प्रभूने जे तुला सांगितले आहे, ते ऐक. श्लोक मला चंद्र ही मूर्यसा ताप देतो जलें पूर्ण ही मेघ दावाग्नि होतो ॥ नदी वात ही सर्पफूकारतुल्य लता मोगऱ्याची जसे बाणशल्य ॥ ५५ ॥ आर्या कुवलयवन हे भाले होती करितात विव्हळ प्राण ॥ झाले तुझ्या वियोगें मजला विपरीत विश्व हे जाण ॥५६॥ आर्या कोणाला सांगावें हे दुःसह दुःख कोण नाशील ॥ माहीत काय इतरां अन्योन्य प्रेम आणि समशील।।५७॥ जाणत होते माझें मन एक परंतु ते तुझ्या मागें ॥ आले रमलें एथें यास्तव मजवर नको भरूं रागें ॥५८॥ सी०- ( ते ऐकून लाजते.) त्रि-सखे सीते, तूं ही कांहीं रामचंद्राला उलट निरोप सांग, आणि काही तरी खूणदे. सी०- अरे हनूमंता, हा माझा उलट निरोप रामचंद्राला सांग. श्लोक. ही वाहते संतत अश्रुधार ॥ तेणे असे व्याकुळ दृष्टि फार ॥ १ अरंण्यांतील अग्नि २ सापाच्या फुसकान्याप्रमाणे