पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ६ प्रसन्नराघवनाटक १२७ मी अग्निप्रवेशाचा निश्चय केला आहे, तर तूं एक अग्नी. चा निखारा घेऊन ये. रा०- हर ! हर ! कशी बरें, वाघाच्या तोंडांतून सुटलेली हर णी पारध्याच्या जाळ्यांत सांपडावी अशी सीतेची गत झा ली. त्रि.- ( जाऊन आल्यासारखे करून ह्मणते. ) सखे सीते, ए. थे अग्नि मिळणे कठीण आहे. रा.- ( आनंदानें ह्मणतो.) शाबास, त्रिजटे आज रामाचे प्राण तूं वांचविले. सी.- ( अशोकवृक्षाला ह्मणते.) श्लोक अशोकाच्या वृक्षा सदय कर चित्तास मजला उदारत्वे दे रे दहनकणिका एक विमला ॥ वियोगाच्या तापास्तव किसलयाच्या च कपटें न की अग्निज्वाला प्रकट करिशी तूं वद हटें ॥४७॥ (पाहून आनंदाने ह्मणते. ) सखे त्रिजटे, हा अशोकाच्या झाडावरून एक अग्नीचा निखारा पडला. ( असें बोलून ज. वळ जाऊन तो घेण्यास इछिते.) रा.- अरे, कसा अशोक ही मला शोकदायक झाला ! ल.- हे आर्य, झाडाच्या शेंड्यावरून विस्तव पडणे हे मला खरे वाटत नाही. आर्याअर्थी दुर्दैवें रामाच्या वन्सा घडणार काय बा नाहीं ।। (सीता तो निखारा हातांत उचलून घेते.) १ अग्निची ठिणगी. रा