पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२६ प्रसन्नराघवनाटक अंक ६ चार करून ह्मणतो. ) अरे, हे कोणाचे बरें शिर असावें। खचीत माझ्या अक्षनामक पुत्राचेच हे शिर आहे. ( असे झणून मूर्छित होऊन पडतो.) त्रि.- अरे, लंकेश्वरा, सावध हो. रा०- ( सावध होऊन ह्मणतो.) अरे, त्या दुष्ट वानराचेच हे कृत्य. तर आतां अगोदर त्याचाच प्राण घ्यावा. ( असें बो. लून निघून जातो.) रामलक्ष्मण (आनंदानें ह्मणतात.) वा, काय हा कथा संदर्भ जुळला आहे. (त्रिजटा सीतेला आलिंगन करून झणते.) सखे जानकी, तुझे पुण्य मोठे ह्मणून जगलीस. सी०- पाप मोठे असें ह्मण. त्रि.- कां बरें ? सी०- रामचंद्राच्या वियोगाग्नीला शांत करणारी जी तरवा. रीची धार तिने माझी उपेक्षा केली; तेव्हा हे पाप कसे नव्हे. हा जीव तरी कशाला पाहिजे. तूं आतां लांकडे रचू. न मोठा अग्नि प्रदीप्त कर, झणजे त्या अनामध्ये ही माझी अं. गें शांत होतील. त्रि-शिवशिव ! अगे असे बोलूं नको, लवकरच तूझा अं. गांचा. आर्या 'चंद्रप्रभासुरंजित मरकत पाषाण तत्सदृशशील चंदनरसलिन अशा रामोरी ताप शांत करशील ॥४६॥ सी.- सखे त्रिजटे, हे आतां समजुतीचे बोलणे पुरे, खरोखरीच १ चांदण्याने चकचकणारा. २ पाचचाख. ३ त्यासारखा आहे, स्वभाव ज्याचा