पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १ प्रसन्नराघवनाटक श्लोक. कंठी शिरी वा हृदयीं 'उदार ॥ कर्णी तुझा नाटकरूप हार ।। घालून मी न्यास जपेन फार। नेतील ते कां मग यास चोर ॥१८॥ सू - त्या कवीच्या मनांत असली शंका कां आली ? श्लोक मुलाच्य वृत्त व जिची रमणीय वाणी ॥ कांता तशीच कविता परकीय कोणी ॥ चोरून चोर जर सागरपार गेला ॥ होईल पात्र मग काय कधी 'शुभाला ॥ १९ ॥ न- हेच खरें, बरें हा कवी तर्कशास्त्रीही आहे असें ऐक. तो, तेव्हां चांदिणे आणि ऊन ही जशी एकेठिकाणी राहावी तसे झाले आहे, कारण कवित्व आणि तार्किकपणा ही दोन्ही त्याकवीमध्ये आहेत. स०- ह्यांत आश्चर्य ते काय ? श्लोक. ज्यांचे कोमलकाव्यमौक्तिकमणी घाली सदा भारती ।। त्यांचा तर्क कठोरवक्रवचनी हानी कशी काय ती ॥ ज्यांणी स्त्रीकुचमंडली मुखभरें आरोपिलें स्वानखां ।। त्यानी मारुनयेत मित्तकरिच्या गंडस्थळी बाणकां ॥२०॥ न - बरें, हे सभासद जातीनेच कविताकुशल आहेत; तेव्हां सह्या कवीच्या कवितेने आनंद पावतील काय ९ सू- होय, अरे ह्या कवीनेच सांगितले आहे १ उत्कृष्ट. २ वर्णनीय. २ वर्तन, छंद . ४ कल्याणाला.५ वाणी६उन्मत हत्तीच्या.