पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रसन्नराघवनाटक अंक RECश्लोकल तुझी चरण नूपुरें मधुर फार ती वाजती ह्मणूनच 'मराल ते रव करावया लाजती ॥ अशाच बघ गौतमीपुलिन भूमिभागांकडे का विदेहतनये तुझा प्रियच राम जेथें रडे ॥१४॥ ल.- हे रामचंद्रा, ऐथें सीता कोठे आहे, आणि गोदावरी नदी ही कोठे आहे? रा०- (विचार करून ह्मणतो. ) माझ्या बुद्धीला मोह झाला त्याने मी फसलों. ( पुन्हा विचार करून ह्मणतो.) अथवा ह्या मोहाने माझें मोठे कार्य केले. लाया जा गोडावीतीरतपोवनांEHRS सौमित्रिसीतायुत मी सुखांत ॥ घालीविली जी क्षणशी दिने ती झाली पुन्हा आज दिनेंच चित्तीं ॥ १५ ॥ (पुन्हा मोठ्या आशेने ह्मणतो. ) बरें, पुन्हा असें घ. डेल काय? कि आर्या वचनामृते तिची ती मी कर्णानी पिईन काय पुन्हा ॥ जी गोदेच्या तीरी देती माझ्या अपूर्व सौख्य मना ॥१६॥ (पडद्यांत ) तुला सुख देण्यासाठी मला FRIE आर्या गोदानदी तुझ्यावर तरंगचामर तसे धवल कमल ॥ हे छत्र स्वकराने धरते रघुकुलनिशाकरा विमल ॥ १७ ॥ रा- (आनंदानें ह्मणतो.) हे माझ्या प्रियेचेंच भाषण खरें, कांकी, हंस. २ शब्द ३ (गौतमी ) गोदावरी ४ ( पुलिन ) तीर