पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रसन्नराघवनाटक अंक ६ ल.-- (मनांत भिऊन ह्मणतो.) बरे, ह्या पक्ष्यांकडे तर राम पाहाणार नाहींना १ रा- (त्यासच पाहून ह्मणतो. )अरे हा पक्षी कोण आहे ? श्लोक जाचे पहा दृदय कुंकुमरेणुरक्त बाहेर आणि करुणापरिपूर्ण आंत ।। कांता नदीपरतटीं करते विलाप पाहून तीस नवळे च तिच्या समीप ॥९॥ ( विचार करून ह्मणतो. ) हा खचीत आपल्या प्रियस्त्रीच्या वियोगाने चिरकाळ दुःखी हतभाग्य असा चक्रवाक पक्षी आहे. ल- अरेरे रामाने ह्या पक्षाकडे पाहिले हे वाईट झालें. रा०- ह्या चक्रवाकाला आणि मला स्त्रीवियोगदुःख समान च आहे; तेव्हां हा चक्रवाक आणि मी सारखेच आहों; किंवा ह्याची आणि माझी बरोबरी कशी होईल ? श्लोक हा चंद्राचा उदय घडतां स्त्रीवियोगास भोगी होतां मित्रोदय मग पुन्हा होतसे स्त्रीप्रसंगी ।। माझें गेलें अधिक शत हे चंद्रसूर्योदयांचें नाही झाला पण जनकजासंग हे दैव ज्याचें ॥१०॥ ल- हे रामचंद्रा, कळ्यांनी भरलेल्या कमळांच्या वेलीत जा. णाच्या ह्या कलहंसाकडे पाहा. रा- (पाहून ह्मणतो.) आर्या निजनखकंपितकमलस्तन भोताली जिचा श्रमर करिती । गुंजारव पण जागृत होईना चंद्रचरणताडित ती ॥११॥