पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ६ प्रसन्नराघवनाटक ११३ श्लोक-mein आणून सीतामुखदे मला ते मालामाणात ज्याची प्रभा स्त्रीसह शांत चित्तें ॥ प्यालास टाकून निशाकरातें पावीव माझें मन शांततेते ॥४॥ ल०- आणखी इकडे शरदृतूमुळे कृश झालेली आणि चंद्रा च्या किरणासारख्या लाहान लाहान लाटांनी शोभणारी नदी आहे ती पाहा. रा- ( पाहून तिला ह्मणतो. ) हे नदी. नआया लाटा तुझ्या जळाच्या सीतेच्या नेत्रलहरिसम दिसती प्रतिदिवशी कृशतेते सीता ही पावते तुझ्या सम ती ॥५॥ तुजला तिजला अंतर इतके हे मात्र वाटते मजला ॥ प्रकृतीने शीतल तूं सीता संताप पावते अबला ॥६॥ ल- हा इकडे प्रफुल्लित काळ्या कमळाच्या आंत अमर आपल्या स्त्रीला घेऊन बसला आहे. हा पहा. रा- ( पाहून त्या अमराला ह्मणतो. ) अरे श्रमरा, लोक जे कर्णशोभि नलिनद्वय नील होतें ॥ गेली जिची नयनकांति पिऊन त्यातें ॥ तूं जाणलेंस कमलद्वय गंधयोगें ॥ झाली प्रिये सह तुझी स्छिति त्यांत रंगें ॥७॥ आर्या कलेस उच्च गुंजारव कर्णोत्पलयुगी जिच्या अमरा॥ त्या माझ्या कांतचे मुख कोठे सांग तूं च मित्र खरा ॥८॥ १ आनंदाने