पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११२ प्रसन्नराघवनाटक अंक (तदनंतर राम लक्ष्मण पडद्याच्या बाहेर येतात श्लोक रा. सौमित्रा चल ये बसू तरुतली कां सूर्य हा जाळतो रात्री सूर्य कसा शशीच बघतो तारापथीं' खेळतो ॥ वत्सा हे तुजला कसे समजले हा 'एणधारी न की कोठे एणविलोचना शशिमुखी प्राणप्रिया जानकी ॥१॥ (पुन्हा अवलोकन करून खिन्न होऊन ह्मणतो. ) अ. रे मी फसलों. हा तर आकाशांतला रोहिणीचा कांत चं. द्रच आहे. (मग चंद्राला ह्मणतो. ) आर्या हे चंद्रा कुमुदांचे बांधव विश्वप्रकाशकर आणि ॥ किरण तुझे तूं मजला कोठे ती सांग जानकी रमणी ॥ २ ॥ व्यर्थ तुला हे वदलों तूं रात्रिचर तुला मृग सहाय ॥ यास्तव रावणसम तूं चोराच्या मानसी दया काय ॥३॥ ल- (मनांत ह्मणतो. ) अरे, शोकानें रामाचें मन चंचल झाले आहे, तर आतां मी त्याला दुसरीकडे नेतों.. ल.- हे रामचंद्रा हा इकडे आपले तोंड उघडून चकोर प. क्षी चंद्राचे किरण पितो आहे तो पहा. रा०- ( चकोराला ह्मणतो. ) अरे चकोरा, तूं. १ आकाशांत. २ रिणधारी.